नवी दिल्ली : सेंट्रल सिल्क बोर्ड बंगळुरुने एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार संस्थेत वैज्ञानिक बी या पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट csb.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ही भरती मोहीम वैज्ञानिक बी च्या 66 पदांची भरती करण्यासाठी राबवण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत असणार आहे.
शैक्षणिक पात्रताकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संबंधित स्पेशलायझेशनमध्ये एमएससी उत्तीर्ण झालेले उमेदवार/कृषी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष अभ्यासक्रम या पदांसाठी अर्ज करू शकतात. संबंधित कामाचा अनुभव असला पाहिजे.
वयोमर्यादा या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वेतन भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
अर्ज शुल्क भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागेल. भरतीसाठी, जनरल/ईडब्ल्यूएस/ओबीसी/माजी सैनिक उमेदवारांना अर्जादरम्यान 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
अशी होईल निवडआयसीएमआर (पीएचडी) जेआरएफ/ एसआरएफ-2022 मध्ये मिळालेल्या रँकच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
'या' भरतीसाठी सुद्धा करू शकता अर्ज... भारतीय क्रीडा प्राधिकरण यंग प्रोफेशनल पदासाठी भरती करणार आहे. अधिकृत वेबसाईट sportsauthorityofindia.gov.in वर जाऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत ही प्रक्रिया असणार आहे. तसेच, उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की, ही निवड कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.