नवी दिल्ली : तरुणांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. CISF द्वारे कॉन्स्टेबल पदासाठी बंपर भरती जारी केली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 710 पदांवर भरती केली जाणार आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होईल.
यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- cisfrectt.in ला भेट द्यावी लागेल. CISF ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 21 नोव्हेंबर 2022 पासून कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. यामध्ये अर्ज करण्यासाठी 12 डिसेंबर 2022 पर्यंत वेळ देण्यात येईल. मात्र, परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
शैक्षणिक पात्रताCISF ने जारी केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांकडे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 23 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच, आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना तपासा.
CISF Vacancy साठी असे करू शकता अर्ज अर्ज प्रकिया सुरू झाल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्समधून अर्ज करू शकता...स्टेप 1 : अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट cisfrectt.in वर जावे लागेल.स्टेप 2 : वेबसाइटच्या होम पेजवर Latest notification लिंकवर क्लिक करा.स्टेप 3 : यानंतर CISF Constable Tradesman Recruitment 2022 Apply Online for 710 Post या लिंकवर क्लिक करा. स्टेप 4 : आता Apply online या ऑप्शनवर क्लिक करा.स्टेप 5 : पुढील पेजवर मागितलेले डिटेल्स भरून रजिस्ट्रेशन करा.स्टेप 6 : रजिस्ट्रेशननंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.स्टेप 7 : अॅप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर, त्याची एक प्रिंट आऊट घ्या.
अर्ज करण्यासाठी शुल्कया पदांसाठी शुल्क जमा केल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. कॉन्स्टेबलच्या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी वर्ग आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून 100 रुपये घेतले जातील. याशिवाय, सर्व उमेदवारांना मोफत अर्ज करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. शुल्क ऑनलाइन भरता येईल.