शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

सामान्य ते असामान्य, कसा होतो हा प्रवास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 5:09 PM

फक्त एक गोष्ट ते नियमितपणे करतात, जे त्यांना कुठल्या कुठे घेऊन जातं..

ठळक मुद्देतुम्ही कुणीही असा, पण तुम्ही खरोखर काय करता, त्यावरुनच तुम्ही काय आहात हे ठरतं.तुम्ही फक्त दिखावा करणारे असलात, तर ते कधी ना कधी लक्षात येतं आणि तुम्ही उघडे पडता.आधी आपल्या कामांची प्रतवारी ठरवा आणि मग बघा, कसा होतो तुमचा प्रवास.. चढत्या श्रेणीनं!

- मयूर पठाडेतुम्हाला काय वाटतं, तुम्ही सामान्य आहात, मध्यम कुवतीचे आहात की असामान्य? अर्थात त्यातही अनेक प्रकार आहेत. काहींना आपल्यातली क्षमताच लक्षात येत नाही. कितीही उत्तम क्वॉलिटीज त्यांच्याकडे असल्या तरी आपण काही विशेष करीत नाही आणि आपण सर्वसामान्यच आहोत, असाच त्यांचा समज असतो, तर अनेक जणांना येत काहीच नाही, त्यांच्या क्षमताही यथातथाच असतात, पण त्याचा गवगवा मात्र ते इतका करतात, की या सम हाच! आपल्यापेक्षा मोठा दुसरा कुणी नाहीच, असंच त्यांना वाटत असतं. तिसºया कॅटेगरीचे लोक म्हणजे ते खरंच मध्यममार्गी असतात. ते स्वत:ला कमीही समजत नाहीत आणि फार भारीही नाही.तुम्ही कुणीही असा, पण तुम्ही खरोखर काय करता, त्यावरुनच तुम्ही काय आहात हे ठरतं. तुमच्या कामावरुनच तुम्ही जज केले जाता. तुम्ही फक्त दिखावा करणारे असलात, तर तेही कधी ना कधी लक्षात येतं आणि तुम्ही उघडे पडता. पण एकदा की तुम्ही उघडे पडलात, तुमची पत गेली, लोकांनी ती ओळखली, की मग संपलं सारं.. सगळ्यांच्या लेखी तुमची किंमत शून्य होते.त्यासाठी आपल्या कामांची प्रतवारी आपण ठरवायला हवी आणि त्या पद्धतीनंच कुठलंही काम करायला हवं, मग ते लहान असो की मोठं. पहिली गोष्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आणि तातडीचं काम सर्वात आधी. ते अगोदरच व्हायला पाहिजे. त्याचा क्रम जर तुम्ही चुकवलात तर मग सगळंच गाडं बिघडत जातं. त्यानंतरची गोष्ट म्हणजे जे तुम्हाला पॉसिबल आहे, शक्य आहे, ते ते करा. थोड्याच कालावधीत तुम्हाला स्वत:लाच नाही, इतरांनाही लक्षात येईल, जे इम्पॉसिबल आहे, तेही तुम्ही करायला लागाल. कुणाचाही सामान्य ते मध्यम आणि असामान्य.. असा प्रवास होतो तो असाच.. अगदी कुणीही त्याला अपवाद नाही. जे जे थोर लोक आजपर्यंत होऊन गेलेत आणि ज्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत, अशा कोणाच्याही चरित्राचा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल.. त्यांनी आधी अत्यावश्यक ते केलं, मग जे त्यांना जमतं ते आणि त्यातूनच असामान्य गोष्टी घडल्या.बघा, तुम्हालाही ते नक्की जमेल..