नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. यासाठी गृह मंत्रालयाने CRPF मध्ये 1.30 लाख कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. CRPF मध्ये थेट भरतीद्वारे लेव्हल 3 पदे भरली जातील. यासंदर्भातील डिटेल्स अधिसूचना लवकरच CRPF च्या crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
किती जागांसाठी होणार भरती?मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण 129929 पदांची भरती केली जाईल, त्यापैकी 125262 पदे पुरुष उमेदवारांसाठी आणि 4467 पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी 10 टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत.
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा माजी लष्करी कर्मचार्यांच्या बाबतीत समकक्ष लष्करी पात्रता असावी. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावी.
निवड प्रक्रियाउमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
वेतनज्या उमेदवारांची कॉन्स्टेबल पदांवर निवड झाली आहे आणि 2 वर्षांचा प्रोबेशन कालावधी ओलांडला आहे, त्यांना 21700 रुपये ते 69100 रुपये वेतन दिले जाईल.
अधिक माहितीअर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप अधिकृत अधिसूचनेत दिल्या नाहीत. मंत्रालयाकडून अधिकृत तपशीलवार अधिसूचना जारी झाल्यानंतर तुम्ही CRPF शी संबंधित अधिक माहित तपासू शकता.