नवी दिल्ली : मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. विशेष बाब म्हणजे 5वी, 8वी उत्तीर्णांनाही नोकऱ्या मिळू शकतात. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेत शिपाई, सफाई कर्मचारी, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर यासह विविध पदांसाठी भरती करण्यात आली आहे.
खालील पदे भरतीद्वारे भरली जाणार आहेत...- ओआयसी पॉलिक्लिनिक-3- आयटी नेटवर्क टेक्निशियन-6- मेडिकल स्पेशलिस्ट-10- गायनेकोलॉजिस्ट-3- लेडी अटेंडंट-7- फिजिओथेरपिस्ट-2- डेंटल ऑफिसर-9 - लॅब टेक्निशियन-5- मेडिकल ऑफिसर-34- लॅब असिस्टंट-7- डेंटल असिस्टंट-12- नर्सिंग असिस्टंट-9- शिपाई-6- फार्मासिस्ट-16- ड्रायवर-4- डेटा एंट्री ऑपरेटर-10- क्लर्क-30- रिसेप्शनिस्ट-2- चौकीदार-6- सफाई कर्मचारी-8
शैक्षणिक पात्रताविविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून 5वी, 8वी पास ते ग्रॅज्युएशन, डिप्लोमा आणि एमबीबीएस या पदव्या मागवण्यात आल्या आहेत. ज्याची संपूर्ण माहिती उमेदवार भरतीच्या अधिसूचनेवरून मिळू शकते.
कसा करावा अर्ज?या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवाच्या प्रतींसह स्वयं-साक्षांकित प्रती जोडून त्या पुढील पत्त्यावर पाठवाव्या लागतील. पत्ता - OIC, स्टेशन मुख्यालय (ECHS सेल) दिल्ली कॅंट.
निवड प्रक्रियादरम्यान, या पदांसाठी उमेदवारांनी केलेला अर्ज 9 जानेवारी 2023 पर्यंत पोहोचला पाहिजे याची नोंद घ्यावी. या पदांवर उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. ज्यासाठी उमेदवारांना तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती ईमेल किंवा फोनद्वारे कळवण्यात येईल. मुलाखतीदरम्यान उमेदवारांना 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा मार्कशीटसह कलर फोटोग्राफ आणि कामाच्या अनुभवाची कागदपत्रे सोबत आणावी लागतील.