इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्दमहत्त्वाचे मुद्दे -
- समानार्थी शब्दांचे वाचन वारंवार असणे आवश्यक आहे. अर्थपूर्ण वाचन असायला हवे. पाठ्यपुस्तकातीलही विविध शब्दांचे अर्थ माहीत असावेत.
- नमुना प्रश्न :-
(1) पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती? (2017)(1) झणी-लवकर (2) अलगत- हळुवार (3) कवन- कविता (4) वेल- कुंजस्पष्टीकरण- पर्यायातील वेल या शब्दाला कुंज समानार्थी शब्द नाही. कुंज हा समूहदर्शक शब्द आहे.(2) गटात न बसणारा शब्द ओळखा. (2018)(1) तुरंग (2) अश्व (3) वारू (4) कुंजरस्पष्टीकरण - घोडा-तुरंग, अश्व, वारू,हस्ती- कुंजरम्हणून पर्याय क्र. - 4 बरोबर(3) समानार्थी अर्थी शब्द अचूक शोधा.सूर्य- -(1) मार्तंड (2) शशी (3) सोम (4) इंदूस्पष्टीकरण -सूर्य- मार्तंड, चंद्र - शशी, सोम, इंदूम्हणून पर्याय क्र. 1 हा सूर्याला समानार्थी शब्द आहे.(4) जलद या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे ?(1) मेघ (2) अंबुद (3) पाणी (4) पयोदस्पष्टीकरण-जलद- मेघ, अंबुद, पयोद, ढगपाणी हा वेगळा पर्याय येईल.(5) चुकीची जोडी निवडा(1) क्षीर-दूध (2) समुद्र- पयोधी (3) क्षेम- कुशल (4) शर- शीरस्पष्टीकरण - पर्याय क्र. 4 मध्येशर-बाण व शीर- दूधम्हणून पर्याय क्र. 4 वेगळा.नमुना प्रश्न :
- पुढील शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.
(1) कासार -(1) डोंगर (2) तलाव (3) थंड (4) नदी(2) वारी -(1) पाणी (2) पर्वत (3) चालणे (4) पती(3) ईश्वर-(1) सूर (2) सुर (3) असुर (4) यापैकी नाही(4) शैल-(1) थंड (2) पर्वत (3) डोंगर (4) जमीन(5) कावळा-(1) हेम (2) पक्षी (3) वायस (4) मयूर(6) सान या शब्दाला समानार्थी शब्दाचा पर्याय शोधा.(1) मोठा (2) लहान (3) धाडस (4) लक्ष(7) गटात न बसणारा शब्द शोधा.(1) ह्य (2) अश्व (3) वारू (4) वारा(8) गटातील वेगळा शब्द निवडा.(1) हेम (2) सोने (3) कांचन (4) सुवर्णा(9) गटातील वेगळी जोडी शोधा.(1) भाल-मस्तक (2) घर- गेह (3) गड- तट (4) कमळ- पद्मा(10) दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द शोधा - मुलगी(1) मुलगा (2) कन्या (3) आई (4) पुत्र(11) कर्ण : कान तसे चंद्र : ?(1) हेम (2) इंदू (3) पंकज (4) सविता(12) सूर्य : सविता तसे चंद्र : ?(1) कौमुदी (2) इंदू (3) लक्ष्मी (4) पदमा(13) गटातील चुकीची जोडी कोणती?(1) व्रण-क्षत (2) वंदन- प्रणिपात (3) समुद्र- जलधी (4) साप- मही(14) चुकीचा पर्याय निवडा(1) तनया (2) तन (3) सुता (4) लेकउत्तरसूची :-(1) 2 (2) 1 (3) 2 (4) 2 (5) 3 (6) 2 (7) 4 (8) 4 (9) 4 (10) 2 (11) 2 (12) 2 (13) 4 (14) 4
- संकलक : तारीश आत्तारखरशिंग, ता. कवठेमहांकाळ, जिल्हा परिषद शाळा