नवी दिल्ली : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (FCI) ज्युनिअर इंजिनिअरसह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॉन एक्झिक्युटिव्ह रिक्रूटमेंट 2022 साठी (FCI Non Executive Recruitment 2022) आजपासून म्हणजेच 6 सप्टेंबर 2022 पासून उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर इंजिनिअर, स्टेनोग्राफर आणि असिस्टंट ग्रेड 3 यासह 5043 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ज्युनिअर पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 34000 रुपये ते 103400 रुपये दरमहा वेतन दिले जाईल. तर स्टेनोग्राफर पदांसाठी दरमहा 30500 ते 88100 रुपये वेतन मिळेल.
या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय, कनिष्ठ अभियंता पदांसाठी वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. सर्व पदांसाठी पात्रता स्वतंत्रपणे सेट केली गेली आहे, त्यामुळे तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.
ऑनलाइन अर्ज करू शकताया पदांसाठी भरतीसाठी निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. उमेदवार फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॉन एक्झिक्युटिव्ह रिक्रूटमेंट 2022 भरतीसाठी 6 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अधिकृत वेबसाइट fci.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी 500 रुपये अर्ज शुल्कही भरावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट तपासू शकतात.