नवी दिल्ली-
जर तुम्ही फास्ट फूड प्रेमी असाल आणि तुम्हाला खाण्याची आवड असेल तर McDonald’s, Greggs आणि Subway या कंपन्यांच्या फास्टफूडची टेस्ट घेण्याची नोकरी तुम्हाला सहज मिळू शकते. विशेष म्हणजे या नोकरीतून तुम्ही तब्बल दरमहा १ लाख रुपये कमावू शकता.
युके स्थित मार्केटप्लेस वेबसाइट MaterialsMarket.com 'टेकअवे टेस्टर्स'ची एक टीम बनवण्यासाठी सध्या कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे. ही टीम व्यावसायिकांसाठी सर्वोत्तम फास्ट फूड पर्याय शोधण्यासाठी काम करणार आहे. या बदल्यात त्यांना उत्तम मोबदला देखील दिला जाईल. ही प्रक्रिया महिनाभर चालणार असून यासाठी यात करणाऱ्या प्रयोगांसाठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थ चाखण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत.
यात Greggs Sausage चं Omelette Breakfast Baguette, McDonald चं Large Big Mac meal औआणि Footlong Subway Meatball Marinara यांचा समावेश आहे. काम करताना संबंधित व्यक्तीला सोबत एक डायरी ठेवावी लागणार आहे. यात त्यांना प्रत्येक फूड टेस्ट केल्यानंतर त्यांचा अनूभव डायरीमध्ये नमूद करावा लागणार आहे. जेवणानंतर तातडीनं दोन तासांनंतर आणि चार तासांनंतर त्यांची एनर्जी लेव्हल, फुलनेस लेव्हल, प्रोडक्टिव्हिटी, स्लगिशनेस आणि ओव्हरऑल सॅटिस्फॅक्शनची माहिती घेतली जाईल.
उमेदवाराला ही सर्व माहिती आणि अहवाल मार्केटप्लेसच्या वेबसाईटवर जाऊन सबमिट करावी लागणार आहे. त्यानंतर कंपनी न्यूट्रिशनिस्टसोबत चर्चा करुन अहवालातील माहितीची तपासणी करेल. या संपूर्ण माहितीचा वापर प्रोफेशनल कम्युनिटीसाठी सर्वोत्तम जेवणाचं नोटबूक तयार करण्यासाठी केला जाईल.
विशेष म्हणजे या नोकरीसाठी उमेदवाराला कोणत्याही अनुभवाची गरज नाही. फक्त मार्केटप्लेसनं इतकं नमूद केलं आहे की उमेदवाराचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक असणं गरजेचं आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २७ मे २०२२ पर्यंत कंपनीची वेबसाइट MaterialsMarket.com वर जाऊन अप्लाय करावं लागेल.