Bank Jobs 2025 : जर तुम्हाला सरकारी बँकेत कॉन्करेंट ऑडिटरची नोकरी हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) कॉन्करेंट ऑडिटरच्या १,१९४ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १५ मार्च २०२५ पर्यंत एसबीआयची वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
ही भरती फक्त एसबीआय आणि त्याच्याशी संबंधित बँकांमधील निवृत्त अधिकाऱ्यांसाठी आहे. तसेच, ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करताना, तुमचे असाइनमेंट डिटेल्ससह सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायला विसरू नका. याबाबतची माहिती अपूर्ण राहिल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
याचबरोबर, या पदासाठी निवड प्रक्रियेत १०० गुणांची मुलाखत असणार आहे. तसेच, उमेदवारांची वयोमर्यादाही तपासली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारीनी यासंदर्भात अधिकृत सूचना पाहावी. याशिवाय,निवड झालेल्या उमेदवारांना ४५,००० ते ८०,००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
कसा करावा अर्ज?१) एसबीआयची वेबसाइट bank.sbi/careers किंवा sbi.co.in/careers वर जाऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागेल.२) रजिस्ट्रेशननंतर सिस्टमद्वारे जनरेटेड ऑनलाइन अर्ज फॉर्म प्रिंट करावा.३) आपला नवीन फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करावा लागेल.४) अर्ज करतेवेळी फॉर्म व्यवस्थित भरा आणि सेव्ह करा. ५) सेव्ह करताना तुम्हाला एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. तो काळजीपूर्वक नोक करून ठेवा किंवा लक्षात ठेवा.
- ज्या उमेदवारांनी फॉर्म अर्धवट भरलेला आहे. त्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डद्वारे पुन्हा फॉर्म ओपन करून भरता येईल. पण लक्षात ठेवा असू द्या की, सेव्ह केलेली माहिती फक्त तीन वेळा बदलता येते. एकदा तुम्ही पूर्ण फॉर्म भरला की, तुम्ही तो सबमिट करू शकता.