नवी दिल्ली – सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलात(CRPF)मध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे. सीआरपीएफच्या पैरामेडिकल स्टाफसह अन्य पदांसाठी विविध ठिकाणी ही भरती होणार आहे. यात ७८९ पदे भरण्यात येतील. या पदांसाठी २० जुलै म्हणजे आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
३१ ऑगस्ट २०२० पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मुदत दिली आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना महिन्याला १ लाख ४२ हजारापर्यंत पगार मिळेल, जर आपल्याला या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.
या पदांसाठी निघाली भरती
इंस्पेक्टर(डायटीशन) – १
सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) - १७५
सब इंस्पेक्टर (रेडियोग्राफर) - ८
सहायक उप निरीक्षक (फार्मासिस्ट) - ८४
सहायक उप निरीक्षक (फिजियोथेरेपिस्ट) - ०५
सहायक उप निरीक्षक (डेंटल टेक्नीशियन) - ०४
सहायक उप निरीक्षक (प्रयोगशाला टेक्निशियन) - ६४
सहायक उप निरीक्षक / इलेक्ट्रो-कार्डियोग्राफी टेक्निशियन - ०१
हेड कांस्टेबल (फिजियोथेरेपी सहायक / नर्सिंग सहायक / चिकित्सा) – ९९
हेड कांस्टेबल (एएनएम / मिडवाइफ) - ३
हेड कांस्टेबल (डायलिसिस टेक्निशियन) - ८
हेड कांस्टेबल (जूनियर एक्सरे सहाय्यक) - ८४
हेड कांस्टेबल (प्रयोगशाला सहाय्यक) - ५
हेड कांस्टेबल (इलेक्ट्रीशियन) - १
हेड कांस्टेबल (स्टीवर्ड) - ३
कांस्टेबल (मसालची) - ४
कांस्टेबल (कुक) - ११६
कांस्टेबल (सफाई कर्मचारी) - १२१
कांस्टेबल (धोबी / वाशरमैन) - ५
कांस्टेबल (डब्ल्यू / सी) - ३
कांस्टेबल (टेबल बॉय) - १
हेड कांस्टेबल (पशु चिकित्सा) - ३
हेड कांस्टेबल (लैब टेक्निशियन) - १
हेड कांस्टेबल (रेडियोग्राफर) – १
एकूण पदे – ७८९
पात्रता
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादादेखील विविध पदांसाठी स्वतंत्रपणे मागितली गेली आहे. यासंदर्भातील माहितीसाठी बातमीच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि अधिसूचना बघा.
या आधारे होणार निवड
या पदांची भरती लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा २० डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.
या शहरांमध्ये परीक्षा घेण्यात येणार
नवी दिल्ली
हैदराबाद
गुवाहाटी
जम्मू
प्रयागराज
अजमेर
नागपूर
मुजफ्फरपूर
पल्लीपुरम
अर्जासोबत भरावयाची रक्कम
अनारक्षित/EWS/OBC (पुरुष उमेदवारांसाठी) २०० रुपये ग्रुप बी पद आणि १०० रुपये ग्रुप सी पदासाठी भरावेत
SC/ST आणि महिला उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही
याठिकाणी अर्ज करा
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजपासून ३१ ऑगस्ट पर्यंत crpf.gov.in वर क्लिक करुन अर्ज भरु शकता, अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक माहिती! भारताविरुद्ध नेपाळच्या बदललेल्या भूमिकांमागे फक्त चीनचा हात नव्हे तर...
प्रियंका गांधींची शिष्टाई यशस्वी होणार?; सचिन पायलटांचं विमान माघारी परतणार
धक्कादायक माहिती! भारताविरुद्ध नेपाळच्या बदललेल्या भूमिकांमागे फक्त चीनचा हात नव्हे तर...
‘या’ ठिकाणी कोरोना लसीच्या अंतिम टप्प्याची चाचणी सुरु; लवकरच लोकांना उपलब्ध होणार
आजपासून ग्राहकांना मिळणार 'हे' नवीन अधिकार; दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांना चाप बसणार