Agniveervayu Non Combatant Recruitment 2024: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अग्निवीर म्हणून हुतात्मा झालेल्या जवानाच्या कुटुंबाला सरकारने सांगितलेली रक्कमच दिली गेली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरून मोठे राजकारणही रंगले होते. विरोधक या योजनेला मोठा विरोध करत असताना हवाई दलाने अग्निवीरांची नवीन भरती काढली आहे.
अग्निवीर वायू नॉन कॉम्बॅटंट रिक्रुटमेंट 2024 असे या भरतीचे नाव असून हाउसकीपिंग आणि हॉस्पिटॅलिटीसाठी ही पदे भरली जाणार आहेत. आजपासून म्हणजेच 17 ऑगस्ट 2024 पासून या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2024 असून हे अर्ज कसे भरावेत याची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय हवाई दलातील ही भरती लढाईसाठीच्या कर्मचाऱ्यांसाठी नाही. उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. केवळ अविवाहित पुरुष उमेदवारच यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे...जरी ही भरती लढाईसाठीच्या जवानांची नसली तरी देखील उमेदवाराला मैदानी चाचणी द्यावी लागणार आहे. उंची - 152 सेमी, छाती विस्तारून- 5 सेमी 1.6 किमीची शर्यत 6.30 मिनिटांत पूर्ण करावी लागेल. याशिवाय प्रत्येकी 1 मिनिटात 10 पुशअप, 10 सिटअप, 20 स्क्वॅट्स करावे लागणार आहेत.
यासाठी वयाची अट देखील आहे. उमेदवारांची जन्मतारीख 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 पर्यंत असणे बंधनकारक आहे. कमाल वय नावनोंदणीच्या तारखेनुसार 21 वर्षे असावे लागणार आहे. लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी याद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी अर्ज निशुल्क भरता येणार आहे. उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.