Govt Jobs:बँकेतनोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी किंवा जे बँकेच्या परीक्षांची तयारी करतात, त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI बँक) ने जूनियर असिस्टेंट मॅनेजर पदासाठी मोठी भरती काढली आहे. या भरतीत एकूण 600 पदे भरली जाणार आहेत.
IDBI ने जाहीर केलेल्या या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून, म्हणजेच 15 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. या पदासाठी उमेदवारांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येईल. अधिकृत वेबसाइटवर अर्ज कसा करायचा ते तुम्ही खाली पाहू शकता.
IDBI मॅनेजरच्या रिक्त पदासाठी अर्ज कसा करावाया पदांसाठी अर्ज करण्यासाठी idbibank.in या अधिकृत वेबसाइटवर जा.वेबसाइटच्या होम पेजवर Current Opening लिंकवर क्लिक करा.यानंतर Apply Online for IDBI Bank Manager Vacancy 2023 या लिंकवर क्लिक करा.पुढील पेजवर विचारलेले सर्व तपशील भरा.नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरा.अर्ज केल्यानंतर, एक प्रिंट घ्या.
अर्ज फीIDBI बँकेने जाहीर केलेल्या या रिक्त पदांसाठी सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांना 1000 रुपये शुल्क जमा करावे लागतील.तर, SC, ST आणि अपंग प्रवर्गासाठी 200 रुपये शुल्क आहे. शुल्क ऑनलाइन भरता येईल.
व्हॅकन्सी डिटेल्सIDBI बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जुनिअर असिस्टन्ट मॅनेजर पदाच्या एकूण 600 पदांवर भरती केली जाईल. यामध्ये सर्व प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात. या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराचे वय 20 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
पगार कितीसरकारी बँकेतील या रिक्त पदावर निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या 4 महिन्यांसाठी स्टायपेंड मिळेल. यानंतर, 6.50 लाख CTC म्हणजेच वार्षिक पगार मिळेल.