नवी दिल्ली: कोरोनानंतर आता हळूहळू सर्व क्षेत्रांमधील कंपन्या पूर्वपदावर येत आहेत. मात्र, कोरोना संकटातही अनेक कंपन्यांनी कमाल कामगिरी केल्याचे दिसून आले. त्यापैकी एक क्षेत्र म्हणजे पेट्रोलियम क्षेत्र. भारतातील पेट्रोलियम कंपन्यांना कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर लाभ झाला. यातच आता अनेकविध कंपन्यांनी नोकरी प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोलियम क्षेत्रातील एक आघाडीचे नाव असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL) विविध पदांची भरती केली जात आहे. साठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक आहे. या महारत्न कंपनीने विविध विभागांमध्ये तंत्रज्ञ, प्रयोगशाळा विश्लेषक आणि कनिष्ठ अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी यांच्या एकूण १८६ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
कंपनीने जाहीर केलेल्या एचपीसीएल तंत्रज्ञ भरती २०२२ च्या नोटिफिकेशननुसार, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ एप्रिल २०२२ पासून सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन २१ मे २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना किमान ५० टक्के गुणांची शिथिलता देण्यात आली आहेत. तसेच १ एप्रिल २०२२ रोजी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
कसा कराल अर्ज?
- अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवरील करिअर विभागात जावे.
- रिफायनरीसाठी टेक्निशियन रिक्रुटमेंटच्या लिंकवर क्लिक करावे.
- ड्रॉप डाउनमध्ये दिलेल्या लिंकवरून उमेदवार भरती नोटिफिकेशन डाउनलोड करावे.
- अर्जाच्या ऑनलाइन पेजवर जावे.
- उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करताना ऑनलाइन माध्यमातून ५९० रुपये भरावे लागतील.