नवी दिल्ली - इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून देशातील विविध सरकारी बँकांमध्ये क्लार्कच्या रिक्त पदांसाठी आज अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (IBPS Clerk Recruitment 2021) इच्छुक उमेदवरा या पदांसाठी आयबीपीएसच्या अधिकृ संकेतस्थळाच्या माध्यमातून ७ ऑक्टोबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. (Golden Opportunity for Jobs in Government Banks, Bumper Recruitment for 7,855 Posts)
विविध सरकारी बँकांमधील क्लार्कच्या ५ हजार ८५८ पदांसाठी ११ जुलै रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. अर्जाची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२१ निर्धारित करण्यात आली होती. आयबीपीएसने या पदांसाठी संशोधित नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तसेच पदांची संख्या वाढवून आता ७ हजार ८५५ एवढी करण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार ज्या उमेदवारांनी या पदांसाठी आधीच अर्ज केला आहे, त्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कुठल्याही प्रकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकतात.
अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा २० ते २८ २८ वर्षांदरम्यान, असली पाहिजे. तर कमाल वयाची मर्यादा ओबीसींसाठी ३ वर्षे आणि एससी व एसटींसाठी ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या वयाची गणना १ जुलै २०२१ पासून केली जाईल.
या पदांवर विद्यार्थ्यांची निवड दोन टप्प्यात केली जाईल. पहिल्या प्राथमिक परीक्षेनंतर मुख्य परीक्षा होईल. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी हे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. दोन्ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होतील.
आयबीपीएसच्या माध्यमातून बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीस बँक, पंजाब आणि सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि यूको बँकमधील क्लार्कची रिक्त पदे भरली जातील.
भरती प्रकियेमधील महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेतअर्ज सुरू करण्याची तारीख - ७ ऑक्टोबर २०२१आवेदन करण्याची अंतिम तारीख - २७ ऑक्टोबर २०२१प्राथमिक परीक्षेची तारीख - डिसेंबर २०२१ (संभाव्य)मुख्य परीक्षेची तारीख जानेवारी २०२१ (संभाव्य)