शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

बँकेत नोकरी! IBPS PO पदावर बंपर भरती, ६ हजाराहून अधिक जागा; अर्ज कसा कराल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 8:03 PM

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्यावतीनं (IBPS) पीओ पदावर बंपर भरती करण्यात येणार आहे. IBPS कडून यासंदर्भातील नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली-

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्यावतीनं (IBPS) पीओ पदावर बंपर भरती करण्यात येणार आहे. IBPS कडून यासंदर्भातील नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलं आहे. जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार प्रोबेशनरी ऑफीसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एकूण ६ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे बँकेत नोकरीची इच्छा असेल तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाजी बातमी आहे. या नोकरीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच २ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार आहे. इच्छुकांना IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोकरी संदर्भात संपूर्ण माहिती मिळवता येईल. 

IBPS द्वारे जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण ६४३२ पदांची भरती केली जाईल. या रिक्त पदासाठी अर्जाची लिंक उद्यापासून अॅक्टीव्ह केली जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २२ ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

अर्ज कसा कराल?१. अर्ज दाखल करण्यासाठी सर्वप्रथम ibps.in या संकेतस्थळाला भेट द्या. 

२. संकेतस्थळाच्या होमपेजवर CAREER NOTICES या लिंकवर क्लिक करा. 

३. यानंतर IBPS PO / MT XII Online Form 2022 for 6432 Post या लिंकवर क्लिक करा. 

४. पुढे Apply Here या पर्यायावर क्लिक करा. 

५. विचारण्यात आलेली सर्व माहिती भरुन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. 

६. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जाचा फॉर्म भरता येईल. 

७. अर्ज दाखल केल्यानंतर अॅप्लीकेशन फॉर्मची प्रिंट घ्यायला विसरू नका. 

कोण-कोणत्या बँकेत मिळेल नोकरी?

बँक ऑफ इंडिया- ५३५ जागासेंट्रल बँक ऑफ इंडिया- २५०० जागापंजाब नॅशनल बँक- ५०० जागापंजाब अँड सिंध बँक- २५३ जागायूको बँक- ५५० जागायुनियन बँक ऑफ इंडिया- २०९४ जागा

कोण करू शकतं अर्ज?IBPS ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, PO च्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी, उमेदवारांना अधिसूचना वाचावी लागेल.  उमेदवारांच्या वयोमर्यादेबाबत बोलायचं झालं तर प्रोबेशनरी ऑफिसरच्या (PO) पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनBanking Sectorबँकिंग क्षेत्र