IIT Placement Offers: जगभरात महागाई आणि मंदीच्या लाटेत बड्या कंपन्यांमध्ये नोकरकपात होत आहे. पण याही परिस्थितीत भारतातील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी पगाराच्या बाबतीत आजवरचे सर्व रेकोर्ड मोडले आहेत. आयआयटीमध्ये प्लेसमेंटचा काळ सुरू झाला आहे यात आयआयटी दिल्ली, मुंबई आणि कानपूरच्या विद्यार्थ्यांना ४ कोटींचं वार्षिक पॅकेज मिळाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा २.१६ कोटींचं वार्षिक पॅकेज इतका होता. याशिवाय १ डिसेंबरला सुरू झालेल्या प्लेसमेंटमध्ये इंटरनॅशनल ऑफर्समध्ये सर्वाधिक २.४ कोटी आणि देशात १.३ कोटींचे वार्षिक पॅकेज आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.
पहिल्याच दिवशी आयआयटी गुवाहाटी, रुडकी आणि मद्रासमध्ये एकूण मिळून ९७८ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. इंजिनिअरिंगच्या या टॉप-३ कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल जॉब देखील मिळाले आहेत. IIT मद्रासचं प्लेसमेंट यावेळी मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांनी चांगलं राहिलं आहे.
IIT रुडकीमध्ये प्लेसमेंटआयआयटी रुडकीमध्ये प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी एकूण ३६५ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. यात ६ इंटरनॅशनल ऑफर्सचा समावेश आहे. यात सर्वाधिक १.०६ कोटींचं पॅकेज एका विद्यार्थ्याला मिळालं आहे. तर सर्वाधिक पॅकेज १.३० कोटी रुपये इतकं देण्यात आलं आहे. आयआयटी रुडकीच्या १० विद्यार्थ्यांना ८० लाखांच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. आयआयटी रुडकीमध्ये ३१ कंपन्यांनी प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला होता. यात जेपी मॉर्गन, मायक्रोसॉफ्ट, टाटा स्टील, उबर, बजाज ऑटो, क्वॉलकॉम, अॅम डायनामिक्स, इंटेल टेक्नोलॉजीस, मेवरिक डेरिवेटिव्स, इनफर्निया, स्प्रिंकलर, एसएपी लॅब्स आणि क्वांटबॉक्स या बड्या कंपन्यांचा समावेश आहे.
IIT गुवाहाटीमध्ये प्लेसमेंटआयआयटी गुवाहाटीमध्ये प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी ४६ कंपन्यांनी एकूण १६८ विद्यार्थ्यांना नोकरीसाठीचे ऑफर लेटर्स दिले आहेत. यात २ ऑफर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ऑफर एका विद्यार्थ्याला २.४ कोटी रुपयांची मिळाली आहे. भारतात नोकरीसाठी १.१ कोटी रुपयांचं सर्वाधिक पॅकेज एका विद्यार्थ्याला मिळालं आहे.
IIT मद्रासमधील प्लेसमेंटआयआयटी मद्रासमधील प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी ४४५ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. यात २५ विद्यार्थ्यांना १ कोटीपेक्षा अधिक वार्षिक पॅकेज मिळालं आहे. आयआयटी मद्रासमध्ये प्लेसमेंटसाठी आलेल्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक १४ ऑफर टेक्सस इन्स्टिट्यूटनं दिल्या आहेत. यानंतर बजाज ऑटो लिमिटेड अँड चेतक टेक लिमिटेडनं १० ऑफर दिल्या आहेत. तर क्वॉलकॉमनं ८ आणि जेपी मॉर्गन कंपनीनं ९ ऑफर दिल्या आहेत.