नवी दिल्ली : इंडिया पोस्टने(India Post) पोस्ट ऑफिस रिक्रुटमेंट 2023 अंतर्गत 30041 रिक्त जागांसाठी अर्ज मागविले आहेत. उमेदवार 23 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. या रिक्त पदांसाठी 10वी उत्तीर्ण अर्ज करण्यास पात्र आहेत. निवडलेल्या उमेदवारांना ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) / डाक सेवक (विशेष सायकल) या पदांवर भरती केली जाईल.
दरम्यान, भारतीय पोस्ट हे दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पोस्ट विभागाचा एक भाग आहे. भारतीय पोस्ट ही भारतातील 23 मंडळे असलेली सरकारी टपाल प्रणाली आहे. उमेदवारांना www.indiapostgdsonline.gov.in द्वारे अर्ज करता येतील. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
या पदारांसाठी 10 वी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. दरम्यान, 18 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार चांगल्या पगारासह आणि अनेक सवलतींसह सरकारी संस्थेअंतर्गत आपले करिअर सुरक्षित करू शकतात. उमेदवारांची निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे केली जाईल. भरती झालेल्या ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) / डाक सेवक या पदांसाठी उमेदवारांना मिळणारे वेतन पुढील प्रमाणे असू शकते.
ग्रामीण डाक सेवक आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर पदासाठी 10,000 रुपये ते 24,470 रुपये असणार आहे. तसेच, शाखा पोस्ट मास्टर पदासाठी 12,000 रुपये ते 29,380 रुपये असे असणार आहे. ब्रांच पोस्ट मास्टर कॅटगरीतील उमेदवारांना TRCA स्लॅब 12 हजार ते 29,380 पर्यंत मिळेल. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर कॅटगरीतील उमेदवारांना 10 हजार ते 24,470 पर्यंत मिळतील.
याचबरोबर, indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा व्यवस्थापक पोस्टमास्टर (BPM) आणि इतर पदांच्या भरतीसाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2023 साठी इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
इंडिया पोस्टच्या 30,000 पेक्षा जास्त जागा - कोणत्या राज्यात कोणत्या कॅटगरीत किती रिक्त आहेत, हे पाहा.