नवी दिल्ली : भारतीय नौदलाने ट्रेड्समन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवारIndian Navy Tradesman Recruitment 2022 साठी erecruitment.andaman.gov.in वर 6 ऑगस्ट 2022 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.
रिक्त पदांची माहितीअधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे भारतीय नौदलात ट्रेड्समनच्या एकूण 112 रिक्त पदांची भरती केली जाईल. यामध्ये 43 पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 32 पदे ओबीसी, 18 पदे अनुसूचित जाती आणि 8 पदे एसटी प्रवर्गासाठी आहेत. या पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना स्तर 1 च्या अंतर्गत 18000 रुपये ते 56900 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
वयोमर्यादा आणि पात्रताभारतीय नौदलातील ग्रुप सी पदांवर भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. याशिवाय, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
कशी होईल निवड?ग्रुप सी पदांसाठी भरतीसाठी निवड लेखी परीक्षा आणि डॉक्युमेट्स व्हेरिफिकेशनच्या आधारे केली जाईल. या लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस इत्यादी विषयांमधून एकूण 100 गुणांचे प्रश्न विचारले जातील. उमेदवार 6 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवार अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.