जर तुम्ही 10 वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला भारतीय नौदलात (Indian Navy) सरकारी नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. भारतीय नौदलात ट्रेड्समन स्किल्ड सिव्हिलियन (Tradesman Skilled Civilian) पदांसाठी भरती होत आहे. यासंदर्भात अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, भारतीय नौदलात नोकरी मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. ट्रेड्समन स्किल्ड सिव्हिलियन या पदासाठी उमेदवार 6 मार्चपूर्वी अप्लाय करू शकतात.
या भरती मोहिमेद्वारे एकूण 119 पदांवर तरुणांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे उमेदवारांना सांगण्यात आले आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तरुणांना नौदलाच्या indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ट्रेड्समन पदासाठी अॅप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रोसेस 7 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली आहे. तसेच, या पदांसाठी अॅप्लिकेशन करण्याची अंतिम तारीख 6 मार्च आहे. अशा प्रकारे, अॅप्लिकेशन करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे.
भारतीय नौदलातील नोकरीसाठी कसा भरावा अॅप्लिकेशन फॉर्म?- नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी indiannavy.nic.in वेबसाइटवर जा.- होम पेजवर तुम्हाला करिअरच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.- आता तुम्हाला Navy Tradesman Skilled Civilian Recruitment Various Post 2023 लिंकवर क्लिक करावे लागेल.- यानंतर पुढील स्टेपमध्ये मागितलेले डिटेल्स भरा आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करा.- रजिस्ट्रेशन केल्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.- अॅप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर, अॅप्लिकेशन फॉर्मची फी भरा.- यानंतर अॅप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट काढा.
किती आहे अॅप्लिकेशन फी?भारतीय नौदलात नोकरीसाठी अर्ज करताना, तुम्हाला अर्ज फी म्हणून पैसे जमा करावे लागतील. जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटगरीतील उमेदवारांसाठी अॅप्लिकेशन फी 205 रुपये आहे. एससी, एसटी उमेदवारांसाठी कोणतीही अॅप्लिकेशन फी नाही. तसेच, उमेदवारांना अॅप्लिकेशनची फी फक्त ऑनलाइन भरावी लागणार आहे.