नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय रेल्वेने एक महत्त्वाची योजना आणली आहे. या विशेष योजनेनुसार, आता भारतीय रेल्वे देशातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देणार आहे. यानंतर अनेकविध क्षेत्रात या तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सांगितले जात आहे. कोरोना संकटाच्या काळात भारतीय रेल्वेने सुरू केलेली ही योजना दिलासादायक ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. (indian railways to train 50000 youths under Rail Kaushal Vikas Yojana Check all details)
“PM मोदींनी ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच गुण जास्त आवडतो”: प्रीतम मुंडे
भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या या योजनेचे नाव आहे रेल कौशल विकास योजना. या योजनेंतर्गत युवकांना फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोणत्याही उद्योगात किंवा कारखान्यांमध्ये फिटर, वेल्डर आणि इलेक्ट्रिशियनसारखे व्यापार अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेऊन देशातील तरुणांना रोजगार मिळू शकेल, असा उद्देश यामागे असल्याचे सांगितले जात आहे.
TVS चा धमाका! Bajaj ला मात देत ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर ठरली हीट; २७२१ टक्क्यांची वाढ
देशभरातील ७५ ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू
रेल्वे कौशल विकास योजनेअंतर्गत देशातील ७५ वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आल आहेत. देशातील तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली असून, युवकांना वेल्डर, फिटर, मशिनरी आणि इलेक्ट्रिशियन सारख्या व्यवसायांचा समावेश असलेल्या चार वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण युवकांना स्वावलंबी आणि कुशल बनवेल तसेच रोजगार मिळवण्यास मदत करेल, असे म्हटले जात आहे.
भन्नाट! Tata Safari गोल्ड एडिशन लॉंच; IPL मध्ये प्रत्येक Six वर देणार २ लाखांची मदत
तरुणांना सर्व सुविधा पुरवल्या जातील
हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असेल आणि युवक कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता ४ प्रकारच्या व्यापारात प्रशिक्षण घेऊ शकतील. प्रशिक्षणादरम्यान तरुणांना सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. देशातील ५० हजार तरुणांना सुमारे १०० तासांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र रेल्वेच्या विविध प्रशिक्षण केंद्रांमधून दिले जाईल. १८ ते ३५ वयोगटातील तरुण या प्रशिक्षणात भाग घेऊ शकतात.
Tata आणतेय स्वस्त CNG कार; केवळ ५ हजार रुपयांत बुकिंगला सुरुवात, पाहा
अशी होईल निवड प्रक्रिया
देशभरातील ७५ केंद्रांवर अर्ज मागवले जातात आणि तरुणांची निवड केली जाते. मात्र, प्रशिक्षण झाल्यानंतर नोकरी किंवा रोजगाराची संधी मिळेल, असा दावा रेल्वेकडून करण्यात येत नाही. रेल्वे तरुणांना रोजगारासाठी तयार करेल. सुरुवातीला एक हजार तरुणांची निवड केली जाईल, जे रेल्वे प्रशिक्षणासाठी पात्र असतील. संपूर्ण तीन वर्षांत ५० हजार तरुणांना प्रशिक्षित करण्याची योजना आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय! Vi सह सर्व दूरसंचार कंपन्यांना दिलासा; ९ उपायांची घोषणा
रेल कौशल विकास योजनेचे महत्त्वाचे मुद्दे
अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे आणि हायस्कूल उत्तीर्ण असावे. प्रशिक्षणासाठी निवड हायस्कूल किंवा गुणवत्तेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. रेल्वे कौशल विकास योजनेंतर्गत कोणतेही आरक्षण लागू नाही. प्रशिक्षणादरम्यान तरुणांना वर्गात ७५ टक्के उपस्थिती असणे अनिवार्य आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना एक परीक्षा द्यावी लागेल, ज्यात लेखी परीक्षेत किमान ५५ टक्के आणि प्रात्यक्षिकात किमान ६० टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल. प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य आहे, परंतु प्रशिक्षणार्थीला स्वतःचे निवास, जेवण आणि प्रवास खर्च उचलावा लागेल. या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थीला आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा, दहावीचे गुणपत्रक, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल.