नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तब्बल 995 जागांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे आणि या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे असे उमेदवार अर्जाची लिंक सक्रिय झाल्यानंतर सदर भरतीसाठी अर्ज करू शकतात. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड II एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीसाठीअधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. अर्ज शुल्क आणि अंतिम नोंदणीची तारीख 15 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील. तसेच, अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड II कार्यकारी पदावर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे. तसेच, राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
यासोबतच, जनरल आणि ओबीसी, ईडब्ल्यूसी प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये विहित अर्ज शुल्क भरावे लागेल. याशिवाय, एससी, एसटी आणि सर्व महिला प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्जाची फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन भरली जाऊ शकते. याचबरोबर, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. इतर पात्रता संबंधित माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
दरम्यान, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड II एक्झिक्युटिव्हच्या एकूण 995 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी 129 पदे आहेत. तसेच, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 133 पदे आणि एससी उमेदवारांसाठी 134 पदे आहेत. याशिवाय, ओबीसींसाठी 222 पदे निश्चित करण्यात आली आहेत. अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 377 पदे आहेत. याचबरोबर, या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये वेतन दिले जाईल. तसेच, अनेक प्रकारच्या सरकारी भत्त्यांचाही लाभ मिळेल.
असा करता येईल अर्ज...- अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जा.- वेबसाइटवर अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत अधिसूचना वाचा.- अर्जाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी, फोटो, आयडी प्रूफ काळजीपूर्वक अपलोड करा.- त्यानंतर अर्जाची फी भरा.- त्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.