गृह मंत्रालयांतर्गत असलेली एक महत्वाची अंतर्गत सुरक्षा एजन्सी इंटेलिजन्स ब्यूरोने (IB) असिस्टेंट सेट्रल इंटेलिजन्स ऑफिसर-I/ एक्झेक्यूटिव्ह, ACIO-II / कार्यकारी, JIO-I / कार्यकारी, JIO-II/कार्यकारी, हलवाई-कम-कुक, कार्यवाहक आणि इतर काही 776 पदांवर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. IB ACIO-II/Tech 2022 पोस्ट भरतीसाठी निवडप्रक्रियेत गेट स्कोर आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमाने उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील.
या भरती प्रक्रियेसाठीचे नोटिफिकेशन आज 7 जुलै 2022 रोजी जारी करण्यात आले आहे. यासाठीची अर्ज प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. तर ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद होईल. या पदांवरील भरतीसाठीची वयो मर्यादा 56 वर्षे ठेवण्यात आली आहे. तर या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सरकारी नियमांप्रमाणे वयोमर्यादेत सूटही देण्यात येईल.
सॅलरी संदर्भात बोलायचे झाल्यास, असिस्टेंट सेट्रल इंटेलिजन्स ऑफिसर-I/ एक्झेक्यूटिव्ह (ग्रुप-बी) पदावर 47600 रुपयांपासून 151100 रुपये महीन्यापर्यंत सॅलरी मिळेल. असिस्टन्ट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर॥ पदासाठी 44900 रुपयांपासून 142400 रुपये महिना, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर । पदासाठी 29200 रुपयांपासून ते 92300 रुपये महिन्यापर्यंत, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर ॥ पदासाठी 25500 रुपयांपासून 81100 रुपये महिन्यापर्यंत, सिक्योरिटी असिस्टन्ट पदासाठी 21700 रुपये ते 69100 रुपये महिन्यापर्यंत, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर (मोटर ट्रांसपोर्ट) । पदावर 25500 रुपयांपासून 81100 रुपये महिन्यापर्यंत, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर (मोटर ट्रांसपोर्ट) ॥ पदासाठी 21700 रुपयांपासून ते 69100 रुपये महिन्यापर्यंत, सिक्योरिटी असिस्टेन्ट (मोटर ट्रान्सपोर्ट) पदासाठी 21700 रुपयांपासून 69100 रुपये महिन्यापर्यंत, हलवाई कम कुक पदासाठी 21700 रुपयांपासून ते 69100 रुपये महिन्यापर्यंत, केअरटेकर पदासाठी 29200 रुपयांपासून ते 92300 रुपये महिन्यापर्यंत आणि ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर ॥ (टेक्निकल) पासाठी 25500 रुपयांपासून ते 81100 रुपये महिन्यापर्यंत सॅलरी मिळेल.
या भरती प्रक्रियेत, असिस्टन्ट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसरची 70 पदे, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ॥ ची 350 पदे, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर । ची 100 पदे, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर । ची 50 पदे, सिक्योरिटी असिस्टन्टची 100 पदे, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर (मोटर ट्रांसपोर्ट ) । ची 20 पदे, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर (मोटर ट्रांसपोर्ट) ॥ ची 35 पदे, सिक्योरिटी असिस्टन्ट (मोटर ट्रांसपोर्ट) ची 20 पदे, हलवाई कम कुकची 9 पदे, केअरटेकरची 5 पदे आणि ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर (टेक्निकल)ची 7 पदे भरली जाणार आहेत.