नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडने (IPPB) भरती अधिसूचना जारी करून ५० हून अधिक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.ippbonline.com/ ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २४ मे पर्यंत भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे माहिती तंत्रज्ञान कार्यकारी पदाच्या एकूण ५४ जागा भरण्यात येणार आहेत. तसेच, कार्यकारी (सहयोगी सल्लागार) ची २८ पदे, कार्यकारी (सल्लागार) ची २१ पदे आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार) ची ५ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्रता आणि इतर माहिती खाली दिली आहे.
पदांसाठी आवश्यक पात्रताअर्ज करणाऱ्या उमेदवाराने संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीई किंवा बीटेक असणे आवश्यक आहे. याशिवाय, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) पास उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीसीए/बीएससी केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादाकार्यकारी (सहयोगी सल्लागार) : २२ ते ३० वर्षेकार्यकारी (सल्लागार): २२ ते ४० वर्षेकार्यकारी (वरिष्ठ सल्लागार) : २२ ते ४५ वर्षे
वेतन किती मिळेल?या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना प्रति वर्ष १०,००,००० ते २५,००,००० रुपये वेतन मिळेल.
अर्जासाठी किती शुल्क?या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. SC, ST, PWD प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये शुल्क भरावे लागेल. तर अर्ज करणाऱ्या इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
निवड कशी होईल?या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.