IRCTC Recruitment 2025 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट irctc.com वर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ४ मार्च पर्यंत आहे.
हॉस्पिटॅलिटी मॉनिटरच्या एकूण ६ पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण पदांपैकी २ पदे जनरल कॅटॅगरीतील आहेत. तर ३ पदे ओबीसींसाठी आणि १ पदे एससी कॅटॅगरीतील राखीव आहेत. तसेच, अर्ज करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा सुद्धा दिली आहे.
शैक्षणिक पात्रताअर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बी.एससी पदवी असणे आवश्यक आहे. पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय पाककला संस्थांमधून बीबीए/एमबीए केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहितीसाठी, तुम्ही जारी केलेली अधिकृत रिक्त पदांची अधिसूचना तपासू शकता.
वयोमर्यादाअर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय २८ वर्षे असले पाहिजे. ओबीसी कॅटॅगरीतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३ वर्षे आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षे शिथिल केली आहे. याचबरोबर, दिव्यांग कॅटॅगरीतील कमाल वयोमर्यादेत १० वर्षांची सूट देण्यात आली आहे.
निवड कशी केली जाईल?उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ३०,००० रुपये पगार मिळेल. पगाराव्यतिरिक्त इतर भत्ते देखील दिले जातील. तसेच, मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल. वैद्यकीय चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल. ही नियुक्ती २ वर्षांच्या कराराच्या आधारावर केली जाईल.