नवी दिल्ली : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्डने बंपर रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 526 पदांवर भरती केली जाणार आहे. या पदासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
इस्रोने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 20 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 09 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या रिक्त पदांद्वारे असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि स्टेनोग्राफर यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
ISRO Vacancy असा करा अर्ज...स्टेप 1- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट- isro.gov.in वर जा.स्टेप 2 - वेबसाइटच्या होम पेजवर ICRB च्या लिंकवर जा.स्टेप 3 - यानंतर ISRO Assistant, UDC, Stenographer, JPA Recruitment 2022 Apply Online च्या लिंकवर क्लिक करा ऑनलाइन अर्ज करा.स्टेप 4 - आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.स्टेप 5 - पुढील पेजवर विचारलेल्या डिटेल्सद्वारे रजिस्ट्रेशन करा.स्टेप 6 - रजिस्ट्रेशननंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरू शकता.स्टेप 7 - फॉर्म भरल्यानंतर प्रिंट घ्या.
पात्रता आणि वयया रिक्त पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता ठेवण्यात आल्या आहेत. बहुतेक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि अधिसूचना पाहा. इस्रोने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा कमी असावे. वयाची गणना 09 जानेवारी 2023 च्या आधारे केली जाईल. या रिक्त पदावरील पात्र उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल. निवड झाल्यानंतर, उमेदवाराला दरमहा 25,500 रुपये पगार मिळेल.