ITBP Constable Recruitment 2024: तरुणांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्यास इच्छुक असलेले तरुण या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स म्हणजेच आयटीबीपीमध्ये (ITBP) तरुणांची भरती केली जाणार आहे.
आयटीबीपीने गट सी साठी ही भरती जारी केली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार, १२ ऑगस्टपासून सुरू होईल, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२४ आहे. उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.
आयटीबीपीने सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि गवंडी या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण २०२ पदांवर भरती होणार असून त्यात कॉन्स्टेबल (सुतार) ७१ पदे, कॉन्स्टेबल (प्लंबर) ५२ पदे, कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) ६४ पदे आणि कॉन्स्टेबल (गवंडी ) १५ पदांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, या पदांवर महिला आणि पुरुष दोघांचीही भरती होणार आहे, म्हणजेच महिलांनाही अर्ज करायचा असेल तर त्या करू शकतात. या भरतीसाठी केवळ तेच उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण केली आहे आणि त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय प्रमाणपत्र देखील आहे.
पात्रतेशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार आयटीबीपीची अधिसूचना म्हणजेच नोटिफिकेशन पाहू शकतात. तसेच, उमेदवाराच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २३ वर्षे असले पाहिले. मात्र, ओबीसी आणि एससी-एसटीसह आरक्षित प्रवर्गांना वयात सवलत देण्यात आली आहे.
किती मिळेल वेतन?आयटीबीपी कॉन्स्टेबलच्या या भरतीमध्ये, उमेदवारांना लेव्हल ३ नुसार वेतन दिले जाईल, जे रुपये २१,७०० ते रुपये ६९,१०० पर्यंत असू शकते. तसेच, निवड प्रक्रियेबद्दल सांगायचे झाल्यास, उमेदवारांची निवड पीईटी म्हणजेच शारीरिक कार्यक्षमता चाचणी, पीएसटी म्हणजेच शारीरिक मानक चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.