नवी दिल्ली : इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये (ITBP) कॉन्स्टेबल भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. आयटीबीपीच्या ग्रुप सी पदांअंतर्गत कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आयटीबीपीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कॉन्स्टेबलच्या (ड्रायव्हर) एकूण ४५८ पदांची तात्पुरती भरती केली जाणार आहे, जी नंतर कायम केली जाऊ शकतात.
या पदांसाठी सुरू असलेली अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच बुधवार, २६ जुलै २०२३ रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी आज रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. आयटीबीपी कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत recruitment.itbpolice.nic.in या भरती पोर्टलला भेट द्यावी लागेल आणि नंतर होम पेजवर दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून भरती अधिसूचना PDF डाउनलोड करावी लागेल.
यानंतर संबंधित ऑनलाइन अर्जाच्या पेजला भेट द्यावी लागेल. अर्ज प्रक्रियेचा एक भाग म्हणून, उमेदवारांना पहिल्यांदा नोंदणी करावी लागेल. यानंतर, उमेदवारांना नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून त्यांचे अर्ज सबमिट करावे लागतील. अर्जाची फी १०० रुपये आहे, जी एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी लागू नाही.
आयटीबीपीने जारी केलेल्या कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांचे वय अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार २६ जुलै २०२३ रोजी २१ वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. दरम्यान, केंद्र सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.