ITI Apprentice Vacancy 2021: जर तुम्ही ITI पास असाल तर तुमच्यासाठी भारत सरकारमध्ये (Govt Jobs) नोकरी करण्याची संधी आहे. नॉदर्न कोलफील्ड्स लिमिटेड (NCL) मध्ये 1500 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ही थेट भरती आहे. कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.
आयटीआयच्या गुणांवर मेरिटच्या आधारे नोकरी दिली जाणार आहे. एनसीएल (Nothern Coalfields Limited) ने आपल्या वेबसाईटवर nclcil.in वर भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. अर्जाची प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. या भरतीमध्ये फिटर, इलेक्ट्रीशियनसह अन्य पदांसाठी अर्ज मागविण्यात आली आहे. भरतीचे नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याबाबतच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत. यावर क्लिक करून तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता आणि अर्ज करू शकता.
पदांची आकडेवारी....फिटर (Fitter) - 800 पदेइलेक्ट्रीशियन (Electrician) - 500 पदेवेल्डर (Welder) - 100 पदेमोटर मॅकॅनिक (Motor Mechanic) - 100 पदे
कोलफील्ड्समध्ये अप्रेंटिस पदांवर सरकारी नोकरी करण्यासाठी तुम्हाला एनसीएल (NCL) च्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 10 जून 2021 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2021 आहे. अर्ज करण्याआधी नॅशनल अप्रेंटिसशिप पोर्टल apprenticeshipindia.org वर रजिस्टर करावे लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी हेल्पलाईन नंबर 07805-256573 सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत संपर्क करता येणार आहे. किंवा rectt.ncl@coalindia.in वर ईमेलही करता येणार आहे.
वयाची अटवयाची अट 16 ते 24 वर्षे आहे. ओबीसींसाठी वयाची अट 27 वर्षे आहे. एससी, एसटीसाठी 29 वर्षे आहे. दिव्यांगांसाठी 10 ते 15 वर्षांची सूट देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आयटीआय संस्थांशी संबंधित संस्थांमधून आयटीआय उत्तीर्णांना ही संधी मिळणार आहे.
NCL Apprentice notification 2021 इथे क्लिक करा...अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...