नवी दिल्ली - सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्यांना उमेदवारांसाठी आता एक खूशखबर आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (All India Institute of Medical Sciences, AIIMS), नवी दिल्ली येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार एम्सची अधिकृत वेबसाईट aiimsexams.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे.
जागा
मेडिकल सुपरिंटेंडेंट- 1 असोसिएट प्रोफेसर- 3 असिस्टेंट प्रोफेसर ईएनटी- 3 असिस्टेंट प्रोफेसर मेडिकल फिजिक्स- 1 असिस्टेंट प्रोफेसर क्लिनिकल हेमेटोलॉजी- 3 असिस्टेंट प्रोफेसर स्टॅटिक्स अँड डेमोग्राफी- 1 असिस्टेंट प्रोफेसर एनेस्थीसिया- 1 असिस्टेंट प्रोफेसर पीडीऐट्रिक्स- 1 असिस्टेंट प्रोफेसर हॉस्पिटल एडमिन- 1 असिस्टेंट प्रोफेसर न्यूक्लियर मेडिसिन- 1 असिस्टेंट प्रोफेसर पॅथोलॉजी- 1 असिस्टेंट प्रोफेसर कार्डियोलॉजी- 1
वयोमर्यादा
उमेदवारांचे कमाल वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क
सामान्य आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1500 रुपये आहे. तर ईडब्ल्यूएस आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1200 रुपये आहे.
पगार
मेडिकल सुपरिटेंडेंट - 1,68,900 - 2,20,400 रुपये असोसिएट प्रोफेसर इन कॉलेज ऑफ नर्सिंग - 67,700 - 2,08,700 रुपये असिस्टेंट प्रोफेसर - 1,01,500 - 1,67,400 रुपये
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in आणि http://www.aiims.edu द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह ऑनलाइन अर्जाची प्रत 15 जुलैपर्यंत संबंधित पत्त्यावर जमा करावी लागेल. उमेदवारांनी आपले अर्ज वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (फॅकल्टी सेल) प्रशासकीय ब्लॉक, पहिला मजला, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अन्सारी नगर, नवी दिल्ली- 110029 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.