शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

JOB Alert : गुड न्यूज! Air India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न घेता होईल निवड, मिळणार 50 हजार पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 2:29 PM

Air India Recruitment 2022 : Air India मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. Air India मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. Air India Airport Services Limited (AIASL) ने मॅनेजर ऑफ फायनान्स, ऑफिसर अकाउंट्स आणि असिस्टंट ऑन अकाउंट्स (Air India Recruitment 2022) ही पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एअर इंडियाची अधिकृत वेबसाईट, airindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 

पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय, उमेदवार https://www.airindia.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी (एअर इंडिया रिक्रूटमेंट 2022) थेट अर्ज करू शकतात. तसेच http://www.aiasl.in/resources/Finance%20Advertisement.pdf या लिंकद्वारे, तुम्ही अधिकृत अधिसूचना देखील तपासू शकता. या भरती (Air India Recruitment 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 7 पदे भरली जातील.

महत्त्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मे 2022

जागा

मॅनेजर फायनान्स - 3ऑफिसर अकाऊंट - 2 असिस्टेंट अकाऊंट - 2

पात्रता

मॅनेजर-फायनान्स – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे चार्टर्ड अकाउंटंट किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे कॉस्ट अकाउंटंट. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे सदस्य किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य किंवा 5 वर्षांचा अनुभव असलेल्या नामांकित विद्यापीठातून फायनान्लमध्ये एमबीए.

ऑफिसर अकाउंट्स - इंटर चार्टर्ड अकाऊंटंट / इंटर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी किंवा फायनान्समध्ये एमबीए. 

असिस्टंट अकाऊंट - मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवीधर (ऑनर्स). तसेच, 1 वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

मॅनेजर फायनान्स - 30 वर्षांपेक्षा जास्त नाही

ऑफिसर अकाऊंट 

सामान्य - 30 वर्षांपेक्षा जास्त नाहीOBC: 33 वर्षांपेक्षा जास्त नाहीSC/ST: 35 वर्षांपेक्षा जास्त नाही

असिस्टंट अकाऊंट

सामान्य - 28 वर्षांपेक्षा जास्त नाहीOBC - 31 वर्षांपेक्षा जास्त नाहीSC/ST - 33 वर्षांपेक्षा जास्त नाही

पगार

मॅनेजर फायनान्स - रु. 50,000/- दरमहाऑफिसर अकाऊंट - रु. 41,000/- दरमहाअसिस्टंट अकाऊंट – रु. 19,350/- दरमहा

निवड प्रक्रिया

निवडलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाjobनोकरी