नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक सुवर्णसंधी आहे. संरक्षण मंत्रालयांतर्गत सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी खूशखबर आहे. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (Hindustan Shipyard Limited, HSL) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. एचएसएल अंतर्गत विविध पदांच्या एकूण 40 जागांसाठी भरती होणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल आहे.
अर्ज कुठे, कसा करायचा?
- एचएसएल भरती 2022 साठी अर्ज करण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट hslvizag.in वरील करिअर विभागावर क्लिक करावं.
- संबंधित भरती नोटिफिकेशन डाउनलोड लिंक आणि ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
- या लिंकद्वारे अर्जाच्या पेजवर जा.
- संबंधित पदाच्या अर्ज लिंकवर क्लिक करून आणि सर्व तपशील भरा.
जागा - 40
जनरल मॅनेजर (एचआर) – 1 पदडिप्टी जनरल मॅनेजर (फायनान्स) – 1 पदडिप्टी जनरल मॅनेजर (टेक्निकल) – 2 पदमॅनेजर (टेक्निकल) – 7 पदमॅनेजर (कमर्शियल) – 2 पदअसिस्टेंट मॅनेजर (फायनान्स) – 1 पदप्रोजेक्ट ऑफिसर (टेक्निकल) – 4 पदप्रोजेक्ट ऑफिसर (एचआर) – 1 पदडिप्टी प्रोजेक्ट ऑफिसर (प्लांट मेंटेनेंस) – 2 पदडिप्टी प्रोजेक्ट ऑफिसर (सिविल) – 2 पदडिप्टी प्रोजेक्ट ऑफिसर (टेक्निकल) – 10 पदडिप्टी प्रोजेक्ट ऑफिसर (आयटी अँड ईआरपी) – 2 पदडिप्टी प्रोजेक्ट ऑफिसर (एचआर) – 2 पदसीनियर कंसल्टेंट (टेक्निकल) – दिल्ली ऑफिस – 1 पदसीनियर कंसल्टेंट (ईकेएम सबमरीन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड आउटसोर्सिंग)– 1 पदकंसल्टेंट (एडमिनिस्ट्रेशन) – दिल्ली ऑफिस – 1 पद
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.