नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डमध्ये (Indian Coast Guard Recruitment 2021) नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय तटरक्षक दलात भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. असिस्टंट कमांडेट (Assistant Commandant) पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबतची एक नोटीफिकेशन जारी केली आहे.
भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडेटच्या 71 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती आणि अर्ज joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांना 17 ऑगस्ट 2022 पासून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे. यासाठी परीक्षा देखील होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
जनरल ड्यूटी - कमीत कमी 60 टक्क्यांसह बॅचलर डिग्री. इंटरमीडिएट मॅथ आणि फिजिक्स सब्जेक्टसह 55 टक्क्यांहून अधिक गुण.
कमर्शियल पायलट लायसेन्स - फिजिक्स आणि मॅथमॅटिक्ससह कमीतकमी 55 टक्क्यांसह बारावी पास.
टेक्निकल मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स - इंजीनिअरिंगची डिग्री
लॉ एन्ट्री - कमीतकमी 60 टक्क्यांसह एलएलबी पास
पगार
असिस्टेंड कमांडेंट - 56,100 रुपये
अर्ज कुठे करायचा?
इच्छुक उमेदवारांना joinindiancoastguard.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येतील. अर्ज प्रक्रिया 17 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असून शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.