नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. इंडिया पोस्टमध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती आहे (India Post Recruitment 2022). या भरतीद्वारे MV मेकॅनिक, MV इलेक्ट्रीशियन, पेंटर, वेल्डर आणि कारपेंटर यांची रिक्त पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने पाठवावेत. 17 ऑक्टोबरपर्यंत हे पाठवणं आवश्यक आहे
एकूण पदं - 7
एमवी मॅकेनिक - 1 पदएमवी इलेक्ट्रीशियन - 2 पदपेंटर - 1 पदवेल्डर - 1 पदकारपेंटर - 2 पद
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता
ग्रुप सी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये आयआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच, एखाद्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे 8वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि एक वर्षाचा अनुभव असल्यास, तो देखील भरतीसाठी अर्ज करू शकतो. यासोबतच एमपी मेकॅनिक पदांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
पगार
निवडलेल्या उमेदवारांना 19,900 रुपये ते 63,200 रुपये पगार दिला जाईल.
निवड प्रक्रिया
या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना ट्रेड टेस्टमधून जावे लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.