नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. गुप्तचर विभागात (Intelligence Bureau Recruitment 2021) काम करण्याची सुवर्णसंधी आहे. तब्बल 527 पदांसाठी भरती होणार आहे. उपसंचालक, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर, सीनियर रिसर्च ऑफिसर, रिसर्च असिस्टंट, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, असिस्टंट जनरल इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह, अकाऊंटंट, सुरक्षा अधिकारी, स्टाफ नर्स, केअरटेकर यासह इतर पदावर भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
विविध पदानुसार ,दहावी, बारावी, पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स देखील असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
विविध पदांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त वयोमर्यादा 56 वर्ष निश्चित करण्यात आली आहे.
एसी, एसटी, ओबीसी, दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
पदांचा तपशील
उपसंचालक - 2डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर - 10ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर - 168सीनियर रिसर्च ऑफिसर - 02रिसर्च असिस्टंट - 2सिनिअर फॉरेन लँग्वेज - 1असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर - 2असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर एक्झिक्युटिव्ह - 56असिस्टंट ज्युनिअर इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह - 96ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर - 13पर्सनल असिस्टंट: 02अकाऊंट ऑफिसर: 03अकाउंटंट: 24सिक्युरिटी ऑफिसर - 08असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर - 12असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर (टेक्निकल) - 10फिमेल स्टाफ नर्स - 01ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर - 52सिक्युरिटी असिस्टंट - 20केअरटेकर - 05हलवाई कुक - 11मल्टी टास्किंग स्टाफ - 24लायब्ररी अटेंडंट - 01
अर्ज कुठे करायचा?
गुप्तचर विभागाच्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज करता येईल. अर्ज डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआऊट काढून सर्व माहिती भरून पोस्टानं पाठवायचा आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत 21 ऑक्टोबर आहे.
अर्ज पाठवायचा पत्ता?
जॉईंट डेप्युटी डायरेक्टर/ इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली - 110021. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.