नवी दिल्ली - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited -IOCL)मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अनेक पदांवर भरती आहे. तब्बल 527 पदांसाठी भरती होणार असून नोटीफिकेशन जारी करण्यात आली आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करणं सुरू झालं आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आसाम ही ज्या राज्यांमध्ये भरती होणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन 5 नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आलं आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर आहे.
ओपनिंगमध्ये, डेटा एन्ट्री ऑपरेटर (Apprentice posts in indian Oil) आणि रिटेल सेल्स असोसिएट या जागा फ्रेशर्ससाठी असणार आहेत. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. ज्याची तात्पुरती तारीख 19 डिसेंबर आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार iocl.formflix.com या IOCL च्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. निवड करण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवारांना 12 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी, निवडलेल्या उमेदवारांना 15 महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल, तर रिटेल सेल्स असोसिएट फ्रेशर्सना 14 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.
असा करा अर्ज
- सर्वप्रथम IOCL ची अधिकृत वेबसाईट iocl.formflix.com वर जा.
- Apply Online वर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा.
- तुमचं नाव, राज्य, लिंग, जन्मतारीख यासह महत्त्वाची माहिती भरा.
- तुमची वैयक्तिक माहिती भरल्यानंतर फी जमा करा.
- अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याची एक प्रिंट तुमच्या जवळ ठेवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.