नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Indian Oil Corporation Limited Recruitment 2021) तब्बल 71 जागांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IOCL Recruitment 2021) नुकतीच जारी करण्यात आली आहे. सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Assistant Quality Control Officer) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी iocl.com या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
'या' पदासाठी भरती
सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Assistant Quality Control Officers) - एकूण जागा 71
वयोमर्यादा
उमेदवाराचं वय 30 वर्षे असायला हवं.
अनुभव
या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कमीतकमी 02 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवड
या पदभरतीसाठी लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, ग्रुप टास्क आणि त्यानंतर मुलाखत अशा पद्धतीनं उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
असा करा अर्ज
- सर्वप्रथम www.iocl.com या इंडियन ऑईलचा ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या.
- यानंतर ‘What’s New’ वर क्लिक करा.
- Recruitment of Assistant Quality Control Officers - 2021 या लिंकवर क्लिक करा.
- तुम्हाला जाहिरात दिसेल या जाहिरातीवर क्लिक करा.
-Click here to Apply Online” वर क्लिक करा आणि आपली संपूर्ण माहिती आणि तपशील भरा.
या अर्जाची एक हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.