नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited, IOCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. IOCL मध्ये ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट - IV (प्रोडक्शन) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार www.iocrefrecruit.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जांसाठी 29 मार्च 2022 पर्यंतची मुदत आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला आठ मार्चपासून सुरुवात झाली आहे.
महत्त्वाची तारीख
ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख - 29 मार्च 2022
जागा
केमिकल डिसिप्लिनमध्ये ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट - IV (प्रोडक्शन) - 4
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे केमिकल/रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मधील तीन वर्षांची पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांसह (आरक्षित प्रवर्गांसाठी 45 टक्के) बीएससी उत्तीर्ण केलेले असावे.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा आणि नंतर स्कील/प्रोफिशिएन्सी/फिजीकल टेस्ट (SPPT)च्या माध्यमातून उमेदवार निवडले जातील.
वेतन
उमेदवारांनी 25 हजार ते 1,05,000 रुपये मासिक वेतन मिळेल.
असा करा अर्ज
- आयओसीएलचे अधिकृत संकेतस्थळ http://www.iocrefrecruit.in वर जा.
- दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज भरून सबमीट करा.
- अर्जाचे प्रिंट घेऊन ते नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवा.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.