नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय उत्तर रेल्वे (Northern Railway Recruitment 2021) येथे दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी मोठी पदभरती होणार आहे. तब्बल 3093 जागांसाठी ही भरती असणार आहे. यासाठीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षण मिळावं यासाठी ही भरती असणार आहे. अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे. आरआरसीची अधिकृत वेबसाईट http://rrcnr.org/ वर अर्ज करता येणार आहे. एकूण 3093 जागांसाठी भरती होणार आहे.
पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
20 ऑक्टोबर 2021 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर डिव्हीजनमध्ये COPA, स्टेनोग्राफर, फिटर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, टेक्निशियनसह वेगवेगळ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती; असा करा अर्ज
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 339 अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. या जागा 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत. त्यामुळेच दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकऱ्यांची ही एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे. ही भरती रेल्वेच्या विविध विभागांसाठी आहे. 10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
पदांची नावं वेल्डरसुतारफिटरइलेक्ट्रीशियनस्टेनोवायरमनइलेक्ट्रॉनिक मेकॅनिकमेकॅनिक डिझेल