कामाच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. दररोज फक्त चार तास काम करून तब्बल 60 हजार कमावण्याची सुवर्णसंधी आहे. लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी Amazon तुम्हाला ही ऑफर देत आहे. याच्यामाध्यमातून तुम्ही तुमच्या महिन्याचं उत्पन्न वाढवू शकता. Amazon चं डिलिव्हरी बॉय होऊन चांगले पैसे कमावता येणार आहेत. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यामध्ये पार्ट टाईम किंवा फुल टाईम काम निवडू शकता.
डिलिव्हरी बॉयला कंपनीच्या वेयरहाऊसमधून पॅकेट घेऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं आहे. Amazon ची केंद्रे प्रत्येक मोठ्या शहरात आहेत. उदाहरणार्थ, दिल्लीत ॲमेझॉनची सुमारे 18 केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे कंपनीने सर्व शहरांमध्ये आपली केंद्रे उघडली आहेत. जिथून योग्य पत्त्यावर पॅकेट पोहोचवणे हे डिलिव्हरी बॉयचे काम असते.
चार तासांत 100 ते 150 पॅकेटची डिलिव्हरी
तुम्ही किती तासांत किती पॅकेट डिलिव्हर करता यावर तुमच्या कामाचे तास अवलंबून आहेत. साधारणत: एक डिलिव्हरी बॉय एका दिवसात जवळपास चार तासांत 100 ते 150 पॅकेट डिलिव्हरी करतो. वस्तुंची डिलिव्हरी करण्यासाठी, तुमच्याकडे स्वतःची बाईक किंवा स्कूटर असणं आवश्यक आहे. बाईक किंवा स्कूटरचं इन्श्योरन्स, आरसी वैध हवी. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.
4 तास काम करून महिन्याला 60 हजार कमवा
डिलिव्हरीशी संबंधित पूर्ण ट्रेनिंग कंपनीकडून देण्यात येईल. डिलिव्हरी बॉयचा निश्चित पगार सुमारे 15 हजार रुपये आहे. आता तुम्ही विचार कराल की मग 60 हजार कसे झाले? त्याबद्दल जाणून घेऊया. प्रत्येक पॅकेटसाठी 10 ते 15 रुपये मिळतात. डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हायडरच्या म्हणण्यानुसार, जर कोणी महिनाभर काम करत असेल तर दररोज 100 पॅकेज डिलिव्हरी करून महिन्याला 55000 ते 60000 रुपये सहज कमावता येतात.
कसा करायचा अर्ज ?
Amazon च्या https://logics.amazon.in/applynow या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी थेट अर्ज करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"