नवी दिल्ली - भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (Bharat Electronics Limited Recruitment ) मोठी भरती होणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ट्रेनी आणि प्रोजेक्ट इंजिनिअर पदांसाठी ही भरती असून एकूण 36 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त पदांच्या अर्जासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट bel-india.in ला भेट द्यावी लागेल. 6 डिसेंबर 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 26 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेले नोटीफिकेशन पूर्णपणे वाचावं. अर्जामध्ये कोणतीही चूक आढळल्यास तो अर्ज नाकारला जाऊ शकतो.
'या' पदांसाठी होणार भरती
प्रोजेक्ट इंजिनिअर सिव्हिल – 24 पद
प्रोजेक्ट इंजिनिअर, इलेक्ट्रिकल – 6 पदे
प्रोजेक्ट इंजिनिअर, मॅकेनिकल – 6 पदे
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी (BEL Recruitment 2021) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित स्ट्रीममधून चार वर्षांची इंजिनिअरींग पदवी असणे आवश्यक आहे. अधिक शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवार जारी केलेलं अधिकृत नोटीफिकेशन पाहू शकतात.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच उच्च वयोमर्यादेत OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट असेल.
निवड प्रक्रिया
मुलाखत आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेल्या अधिकृत नोटीफिकेशनमध्ये पाहू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.