शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

RBI मध्ये नोकरीची संधी!, पात्रता काय आणि कसा कराल अर्ज? वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 9:23 AM

RBI JE Recruitment 2021: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअरपदासाठी सरकारी नोकरभरती निघाली आहे.

RBI JE Recruitment 2021: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअरपदासाठी सरकारी नोकरभरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. रिर्झव्ह बँकेने ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) आणि ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) विभागात एकूण ४८ जागांसाठी भरती केली जाणार आहे. 

रिझर्व्ह बँकेने आज नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुक उमेदवारांना बँकेच्या rbi.org.in या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधिची सर्व माहिती जाणून घेता येणार आहे. ऑनलाइन फॉर्मच्या माध्यमातून इच्छुकांना आपला अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू होणार आहे आणि उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. 

पात्रता काय?आरबीआयच्या ज्युनिअर इंजिनिअर भरतीच्या जाहिरातीनुसार उमेदवारानं देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं असावं. याशिवाय, इलेक्ट्रीकल किंवा सिव्हील विभागातून डिल्पोमा विभागातून कमीतकमी ६५ टक्के गुण आणि डीग्री परीक्षेत कमीतकमी ५५ टक्के गुणांनी उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे. यासोबतच संबंधित कामासाठी उमेदवारांना कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असणं देखील गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. उमेदवारांचं वय १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत २० वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा अधिक नसावं, अशीही अट आरबीआयने घातलेली आहे. पण एससी, एसटी, ओबीसी आणि अन्य प्रवर्गातील उमेदवारांना यातून सूट देण्यात आली आहे. 

सुरक्षा गार्ड आणि ग्रेड बी ऑफीसर पदासाठीही भरतीआरबीआयकडू याआधीच तब्बल २४१ पदांसाठी सुरक्षा गार्डच्या पदासाठीही भरती निघाली आहे. तर ग्रेड बी ऑफीसर पदासाठी ३२२ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया याआधीच सुरू देखील झाली आहे. सुरक्षा गार्डसाठीची अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख १२ फेब्रुवारी आहे. तर ग्रेड बी ऑफीसर पदासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.  

टॅग्स :jobनोकरीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक