Konkan Railway Recruitment: गेल्या अनेक महिन्यापासून खासगी तसेच सरकारी खात्यांमधील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच कोकण रेल्वेनोकरीची सुवर्ण संधी देत आहे. कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, शैक्षणिक अर्हता, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अन्य महत्त्वाची माहिती जाणून घ्या...
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत चीफ मॅकेनिकल इंजिनीअर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. चीफ मॅकेनिकल इंजिनीअरचे १ पद भरले जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. नोकरीचा कालावधी हा ३ वर्षांचा असून तो ५ वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो.
नवी मुंबई येथे काम करावे लागणार
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कॉर्पोरेट ऑफिस, बेलापूर, नवी मुंबई येथे काम करावे लागणार आहे. तसेच उमेदवारांना १ लाख २० हजार ते २ लाख ८० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
दरम्यान, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांनी आपले अर्ज krclredepu@krcl.co.in या ईमेल आयडीवर किंवा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., कॉर्पोरेट कार्यालय, भर्ती कक्ष, ६ वा मजला, प्लॉट क्र.६, सेक्टर-११, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, ४००६१४ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. १२ ऑक्टोबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, असे सांगितले जात आहे.