माल वाहतुकीसाठी वापरात येणारा मोठा मार्ग म्हणजे सागरी मार्ग. आजही मोठ्या प्रमाणात सागरी वाहतुकीचा वापर केला जातो. जहाजातून व्यापारी मालाची आयात आणि निर्यात केली जाते. त्यामुळे जहाज बांधणी, जहाज उद्योगाशी विविध निगडित अनेक घटकांचे क्षेत्रही विस्तारते आहे. आधुनिक तंत्राचा वापर या क्षेत्रात होत असल्याने कुशल मनुष्यबळाची गरजही मोठ्या प्रमाणात भासते आहे. या बाबींचा विचार करता मरिन इंजिनीअरिंग हे क्षेत्र फायद्याचे ठरू शकते.मर्चंट नेव्ही हे युद्धप्रवण नसलेले, एक वेगाने विकसित होणारे व्यावसायिक क्षेत्र आहे. जे समुद्रातील मालवाहक कार्गो आणि कधीकधी प्रवाशांशी संबंधित असते. त्यामुळे या करिअरमध्ये पॅसेंजर व्हेसल्स, कार्गो लायनर्स, टँकर्स, कॅरिअर्स तसेच इतर अनेक प्रकारची वाहनेयांचा समावेश होतो. या क्षेत्रातील करिअरमध्ये भरपूर साहस दाखवण्याची व विदेशातील शहरांमध्ये जलप्रवास करण्याची संधी मिळते. सर्वात शेवटी हे एक भरपूर पगार मिळवून देणारे व आशादायक बढतीच्या संधी मिळवून देणारे, किफायतशीर करिअर आहे.पात्रताया क्षेत्रात करिअर करण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्ससह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या विषयात बीई किंवा बीटेक हे पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. तसेच बीई वा बीटेक कोर्समध्ये प्रवेश जेईईच्या गुणांच्या आधारावर मिळतो. या विषयात पदव्युत्तर पदवीही घेता येते. इथे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. तसेच त्यास दृष्टिदोष असता कामा नये. तसेच एक यशस्वी मरिन इंजिनीअर होण्यासाठी टीमवर्क करता यायला हवे. तसेच प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची तयारी हवी. त्याचबरोबर नेतृत्वगुण, तार्किक अंदाज बांधणे, उत्तम संवादकौशल्य असल्यास फायद्याचे ठरते.मर्चंट नेव्हीच्या भारतात व भारताबाहेर भरपूर संधी उपलब्ध आहेत. यासाठी सामान्य विद्यार्थी व पदवीधारकांनी जहाजावर जाण्याअगोदर प्रशिक्षण घेणे गरजेचे ठरते. जर कुणाला अधिकारी बनायचे असेल, तर त्याला प्रि-सी कोर्सेस करून कॅडेट बनावे लागेल. विद्यार्थी १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर ज्याने फिजिक्स-केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्समध्ये पदवी घेतली आहे तो डेक कॅडेट किंवा इंजीन कॅडेटला जाऊ शकतो. एखादा मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा नेव्हल आर्किटेक्ट विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअरिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतो. डेक कोर्सेसचे महत्त्व थोड्याच दिवसांत वाढत जाऊन, त्याला कॅप्टन ही पदवी मिळू शकते. तर इंजिनीअर हा मुख्य इंजिनीअर होऊ शकतो.संधी : मर्चंट नेव्हीमध्ये कंटेनर शिप्स, बल्क कॅरिअर्स, आॅईल टँकर्स आणि केमिकल टँकर्स या चार प्रकारची जहाजे असतात. मर्चंट नेव्ही हे एक जास्त पगार असणाऱ्या काही करिअर्सपैकी एक आहे. पगार हा वर्षाकाठी ९ लाखांपर्यंत असू शकतो. कारण पगाराची रचना कंपनी, शहर, आयात-निर्यातीची गरज इत्यादीनुसार वेगवेगळी असते. पगाराच्या फायद्याशिवाय यामध्ये आणखीही काही लाभ आहेत. जसे कराचे फायदे, भरपूर सुट्या, शिस्तबद्ध जीवनशैली, प्रेरणादायी साहस दाखवण्याच्या भरपूर संधी आहेत.
मरिन इंजिनीअरिंग क्षेत्रात मोठ्या संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 4:09 AM