LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडने (LIC HFL) सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी (LIC HFL Recruitment 2022) अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार lichousing.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२२ आहे. या भरतीद्वारे एकूण ८० पदे भरण्यात येणार असून यामध्ये ५० पदे सहाय्यक आणि ३० पदे सहाय्यक व्यवस्थापकासाठी आहेत.
अर्जासाठी शुल्क / वयोमर्यादासहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना अॅप्लिकेशन फीच्या रुपात ८०० रूपये भरावे लागणार आहेत. तसंच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा अधिक असू नये. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
कसा कराल अर्ज
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना lichousing.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या करिअर या टॅबवर क्लिक करा.
- करिअरवर क्लिक केल्यानंतर आता अर्ज करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन आणि अॅप्लिकेशन प्रोसेस पूर्ण करा.
- फॉर्म भरल्यानंतर शुल्क भरा आणि अर्जाची प्रिन्टआऊटही घेऊन ठेवा.