नवी दिल्ली: देशातील सर्वांत आघाडीची विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC मध्ये काम करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. LIC च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) विभागातील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. असोसिएट पदांवर ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून, वार्षिक ९ लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. (lic recruitment 2021 vacancy for associate post in lic housing finance)
LIC च्या या जागांच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन चाचणी घेतली जाणार आहे. या टेस्टची मेरिट लिस्ट आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल, असे सांगितले जात आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
LIC कर्मचाऱ्यांना दुप्पट लाभ; २५ टक्के पगारवाढ, ५ दिवसांचा आठवडा आणि...
असोसिएट पदासाठी पात्रता काय?
ज्या उमेदवारांनी सोशल वर्क किंवा रूरल मॅनेजमेंटमध्ये किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, ते उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील. तसेच १ जानेवारी २०२१ पर्यंत वय २३ ते ३० वर्षांच्या दरम्यान असायला हवे. एलआयसी एचएफएल (LIC Housing Finance) ची वेबसाइट lichousing.com द्वारे अर्ज करायचा आहे.
पदांची माहिती आणि मुदत
LIC Housing Finance मधील असोसिएटच्या ६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी सीटीसी (पगाराचे वार्षिक पॅकेज) ६ ते ९ लाख रुपये वार्षिक देण्यात येईल. २४ मे २०२१ रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०२१ आहे. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुक्ल आकारण्यात येणार नाही, अशी माहिती मिळाली आहे.