LIC Recruitment 2023: भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वांत मोठी आणि आघाडीची कंपनी आहे. देशातील कोट्यवधी लोकांनी LIC च्या विविध प्रकारच्या पॉलिसी घेतल्या आहेत. पॉलिसींमधील वैविध्य आणि काळानुरुन योजना हे LIC च्या पॉलिसीची वैशिष्ट्ये असल्यामुळे इतक्या वर्षांनंतरही एलआयसीवरील देशवासीयांचा विश्वास कमी झालेला नाही. याच LIC मध्ये नोकरीची सुवर्ण संधी असून, पदवीधरांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
LIC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपण या भरती प्रक्रियेची माहिती घेऊ शकता. एलआयसीने या भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. LIC AAO भरती २०२३ साठी अर्ज करण्यासाठी १५ जानेवारीपासून ऑनलाइन विंडो सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ३१ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. एलआयसीच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार परिक्षेच्या ७ ते १० दिवस आधी आपले कॉल लेटर डाउनलोड करू शकतात. या भरतीसाठी पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारीला होणार असून, मुख्य परीक्षा १८ मार्चला होणार आहे.
किती जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे?
एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, LIC AAO 2023 साठी एकूण ३०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. LIC India च्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून पदवीधर असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठीची वयोमर्यादा किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे आहे.
कसा करावा अर्ज?
- LIC AAO 2023 भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने अधिकृत वेबसाइट licindia.in ला भेट द्यावी.
- यानंतर, होम पेजवर करिअर या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
- येथे उमेदवारांनी Recruitment of AAO(Generalist)-2023 वर क्लिक करावे.
- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल आणि उमेदवारांना या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
- यापुढे तुम्ही तुमची सर्व आवश्यक माहिती भरून तुमचा फॉर्म भरू शकता.
- फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर फी जमा करावी आणि त्याची प्रिंट घेऊन ती तुमच्याकडे ठेवावी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"