मुंबई - सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठीची नियमावली जारी झाली आहे. महापारेषणच्या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण २४३ पदे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेमध्ये असिस्टंट इंजिनियर (ट्रान्स.), असिस्टंट इंजिनियर (दूरसंचार), असिस्टंट इंजिनियर (सिव्हिल), चीफ इंजिनियर (ट्रान्स.), सुपरिटेंडेंट इंजिनियर (ट्रान्स.), सुपरिटेंडेंट इंजिनियर (सिव्हिल), चीफ जनरल मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान) एक्झिक्युटिव्ह निर्देशक (संचालन) आणि एक्झिक्युटिव्ह निर्देशक (उपक्रम) भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.
इच्छुक उमेदवार महापारेषणच्या mahatransco.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. त्याशिवाय उमेदवार थेट https://www.mahatransco.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज दाखल करू शकतात. महापारेषणच्या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण २४३ पदे भरली जाणार आहेत.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण नोंदी पुढीलप्रमाणे आहेत - भरतीमधील एकूण पदांची संख्या २४३- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल - नोटिफिकेशनमध्ये पदांसाठी सांगितलेली पात्रता उमेदवारांकडे असली पाहिजे या भरतीसाठीची पदनिहाय वर्योमर्यादा पुढील प्रमाणे आहेएक्झिक्युटिव्ह संचालक - ५९ वर्षेसीजीएम - ५० वर्षेचीफ इंजिनियर - ५० वर्षे सुपरिटेंडेंट इंजिनियर ४५ वर्षेइच्छुक उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क खुला प्रवर्ग - ८०० रुपये आरक्षित जाती श्रेणी आणि ईडब्ल्यूएस ४०० रुपये