शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मुंबई महापालिकेत २००० रिक्त जागांसाठी मेगा भरती; २६ जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 18:07 IST

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS यासाठी ९०० ते १००० पदांसाठी जागा निघाल्या आहेत. तर प्रशिक्षित अधिपरिचारिका या पदासाठी ९०० ते १००० जागा निघाल्या आहेत.

मुंबई – महापालिकेच्या विविध विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण १८५० ते २०७० रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईनपद्धतीने हा अर्ज भरायचा आहे. यासाठी २६ जून २०२१ पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे.

कोणकोणत्या पदांसाठी निघाली भरती?

वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेस्टिव्हिस्ट(MD Medicine) अटेस्टंट(एमडी) नेफ्रोलॉजिस्ट, ओलॉजिस्टन, न्यूरोलॉजिस्ट या पदांसाठी ५०-७० जागा निघाल्या आहेत. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS यासाठी ९०० ते १००० पदांसाठी जागा निघाल्या आहेत. तर प्रशिक्षित अधिपरिचारिका या पदासाठी ९०० ते १००० जागा निघाल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता

पद क्र १ -  

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक असावा

उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत असावा

पद क्र. २ –

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक असावा

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा(आयुर्वेद व होमिओपविक) नोंदणीकृत असावा

पद क्र ३ –

जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा पदवीधारक असावा

त्याचसोबत योग्य त्या नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असावा

वयोमर्यादा – ९ जून २०२१ पर्यंत उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी आणि ३३ वर्षापेक्षा अधिक असता कामा नये

मानधन – रिष्ठ वैद्यकीय सल्लागार – दीड लाख ते २ लाख, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी ५० हजार ते ८० हजार आणि प्रशिक्षित अधिपरिचारिका – ३० हजार रुपये

नोकरीचं ठिकाण – मुंबई  

अर्ज करण्याची शेवटची मुदत – २६ जून २०२१

सर्वसाधारण अटी

१. उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवारा विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात.२. उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने नैतिक अधपतन किंवा फौजदारी स्वरूपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास, तसेच उमेदवारविरुद्ध पोलीस चौकशी/ न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास/ शिक्षा झालेली असल्यास उमेदवाराने त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.३. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेवाराने कुकीची माहिती /प्रमाणको कागदपत्रे सादर केल्यास किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्यास निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.४. उमेदवार नोकरी करीत असल्यास पूर्वीच्या नियोक्त्यांचे ना- हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.५. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्पावर थांबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्त यांना आहेत.६. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल७. निवड झालेल्या उमेदवारांस रुपये १०० /- किंवा विधि आकाराप्रमाणे (वेतन मिळतीनुसार) ब्रान्ड पेपरवर विहित नमुन्यातील कंत्राट करार करणे आवश्यक असून सदरहू खर्च संबधित उमेदवारास करावा लागेल.८.कुठल्याही कारणास्तव निवड झालेल्या उमेदवारास पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने ३० दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक

अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in

अर्ज या ईमेलवर पाठवावे – covid19mcgm@gmail.com/stenodeanl@gmail.com

 

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाjobनोकरी