शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

मुंबई मेट्रोमध्ये काम करण्याची संधी! रिक्त पदांवर नोकरभरती; २.१६ लाखांपर्यंत पगार, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 8:50 PM

मुंबई मेट्रोमध्ये कोणत्या आणि किती पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शेवटची तारीख जाणून घ्या...

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून सरकारी असो वा खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये बंपर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकारनेही आगामी सुमारे दीड वर्षांत १० लाख रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे. यातच आता मुंबईतील मेट्रोमध्ये काम करण्याची उत्तम संधी इच्छुकांना आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळावर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

MMRDA मध्ये उप. मुख्य अभियंता/अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता या पदाच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांकडून ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. 

मेट्रो चीफ इंजिनीअर पदासाठी अर्ज

मेट्रो चीफ इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे चीफ इंजिनीअर पदाचा किमान १५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांना मुंबई मेट्रो प्राधिकरणाने आखून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १ लाख ३१ हजार १०० ते २ लाख १६ हजार ६०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे.

डेप्युटी चीफ इंजीनिअर/ सुप्रिंटेंडींग इंजिनीअर पदासाठी अर्ज

डेप्युटी चीफ इंजीनिअर/ सुप्रिंटेंडींग इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच डेप्युटी चीफ इंजीनिअर/ सुप्रिंटेंडींग इंजिनीअर पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांना मुंबई मेट्रो प्राधिकरणाने आखून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७८ हजार ८०० ते २ लाख ९ हजार २०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर पदासाठी अर्ज

एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे एक्झिक्युटीव्ह इंजिनीअर पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांना मुंबई मेट्रो प्राधिकरणाने आखून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६७ हजार ७०० ते २ लाख ८ हजार ७०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

डेप्युटी इंजिनिअर/ असिस्टंट इंजिनिअर पदासाठी अर्ज

डेप्युटी इंजिनिअर/ असिस्टंट इंजिनिअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे एक्झिक्युटीव्ह इंजिनीअर पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांना मुंबई मेट्रो प्राधिकरणाने आखून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५६ हजार १०० ते १ लाख ७७ हजार ५०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

दरम्यान, उमेदवारांनी आपले अर्ज प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, ८वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. २१ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.  

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन