शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

कृषी क्षेत्रातील नवीन क्षितिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:43 AM

भारत कृषी प्रधान देश आहे. कृषीक्षेत्रात आपण आज प्रगती करीत आहोत. या क्षेत्रात कार्यरत होऊन प्रगतीशील होण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत.

भारत कृषी प्रधान देश आहे. कृषीक्षेत्रात आपण आज प्रगती करीत आहोत. या क्षेत्रात कार्यरत होऊन प्रगतीशील होण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. आज आपण या क्षेत्राशी संबंधित करिअर कसे करता येईल ते जाणून घेणार आहोत. कृषी विज्ञान, कृषी अर्थशास्त्र आणि कृषी अभियांत्रिकी तसेच पुष्पोत्पादन आणि उद्यान कृषी ह्या काही कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण शाखा आहेत ज्यांची आपण माहिती घेणार आहोत.कृषी विज्ञानकृषी विज्ञान म्हणजे कृषी क्षेत्राच्या वैज्ञानिक, तांत्रिक आणि व्यापारिक बाजूंचा अभ्यास करणे. कृषी विज्ञानमध्ये शेतीचे उत्पादन वाढविणे, उत्तम प्रतीचे उत्पादन करणे आणि धान्य उत्पादनात येणाऱ्याअडथळ्यांवर मात करणे या विषयांशी संबंधित संशोधनआणि विकास यावर काम केलेजाते.या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी इ.रू. (कृषी विज्ञान) ही पदवी मिळवावी लागते. पदव्युतर शिक्षणात म्हणजेच ट.रू. मध्ये सोइल कन्जर्वेशन, वॉटर कन्जर्वेशन, प्लांट फिसिओलॉजी, फार्मिंग सिस्टीम मॅनेजमेंट, सिड टेक्नॉलॉजी इ. अनेक विषयांचा अभ्यास करता येतो. या शिक्षणाचा उपयोग स्वयंरोजगारात करता येतो. तसेच सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये रोजगार संधी उपलब्ध होते.कृषी अर्थशास्त्रभारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. यामुळे कृषी अर्थशास्त्राला विशेष महत्त्व आहे. कृषी अर्थशास्त्रामध्ये कृषी उत्पादन आणि कृषी व्यवसाय यांचा अभ्यास करून अर्थशास्त्रातील सिद्धान्ताचा वापर करून कृषी उत्पादनातील अडचणींना दूर करणे त्याचप्रमाणे कृषी अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणे यांचा समावेश होतो.या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी इ.रू. (कृषी अर्थशास्त्र ) यात पदवीधर होणे गरजेचे आहे, त्यानंतर ट.रू. म्हणजेच पदव्युतर शिक्षणामध्ये फार्मिंग फायनान्स, पॉलिसी, मार्केटिंग, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट यांचा अभ्यास केला जातो. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यावर अनेक शासकीय संस्थांमध्ये रोजगार संधी उपलब्ध होते.कृषी अभियांत्रिकीकृषी अभियांत्रिकी या क्षेत्रात फार्म इक्विपमेंट, रुलर स्ट्रक्चर, इरिगेशन आणि ड्रेनेज तसेच रुलर इलेक्ट्रिसिटी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. थोडक्यात सांगायचे तर या क्षेत्रात अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादन वाढवणारी साधने बनविली जातात. या क्षेत्राचा गेल्या काही वर्षांत बराच विस्तार झाला आहे. या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी अ‍ॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग चा डिप्लोमा, इ.ए. / इ.ळीूँ. , ट.ए. / ट.ळीूँ. मिळवावे लागते. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यावर शासकीय आणि खाजगी कंपन्या, संशोधन विभाग अशा अनेक ठिकाणी रोजगार संधी उपलब्ध होते.पुष्पोत्पादनपुष्पोत्पादन म्हणजेच फुलांची शेती. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या व्यवसायाने चांगला जम बसविला आहे. विविध फुले आणि शोभेची झाडे यांची शेती करून ते बाजारपेठ तसेच कॉस्मेटिक आणि परफ्युम इंडस्ट्रीला पुरविणे हा या व्यवसायाचा प्रमुख भाग आहे. या क्षेत्रात येण्यासाठी कृषी विज्ञानात पदवीधर होऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी फ्लोरीकल्चर किंवा होर्टिकल्चर या विषयांची निवड करू शकता.उद्यान कृषीउद्यान कृषी म्हणजेच होर्टीकल्चर थोडक्यात सांगायचे तर बागायत काम. यामध्ये फलोत्पादन, पुष्पोत्पादन, औषधी वनस्पतींची बागायत केली जाते. या क्षेत्रात झाडे त्यांची सुंदरता, उपयोगता, त्यांचा वापर तसेच त्यांचे उत्पादन वाढविणे यावर भर दिला जातो. ही शाखा फूड प्रोडक्शनच्या शाखेशी निगडित आहे. या क्षेत्रात येण्यासाठी होर्टीकल्चरमध्ये पदवीधर किंवा पदव्युतर म्हणजेच इ.रू. आणि ट.रू. मिळविणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील शिक्षणानंतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रांमध्ये कार्यरत होता येते. संशोधन क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत.- डॉ. श्रेया उदारेकरिअर काऊन्सलर